रयतसंदेश न्युज अमळनेर :-
रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी रत्नप्रवाह प्रवचन मालेत सांगितले की तुम्हाला आवडते त्या चांगल्या कामात सातत्य ठेवा. त्यात खंड नको. व ते मनापासून आनंदाने करा. माझ्या गुरुदेवांनी सांगितले, पुस्तक लिहायला सुरुवात कर, मी लिहायला सुरुवात केली. ५७ वर्षाच्या संत आयुष्यात ४६५ पुस्तके लिहिली. एक पुस्तक कोण्या संताचे मस्तक असते. असे भावपूर्ण उद्गार रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा. यांनी अमळनेर येथील रत्नप्रवाह प्रवचनमालेत काढले. ते १० वे पुष्प गुंफतांना बोलत होते.या प्रसंगी प्रवचन प्रभाविका श्री संवेगनिधीश्रीजी म.सा. उपस्थित होत्या.
जीवनात यश मिळविण्यासाठी मोठे बनण्यासाठी गुरूदेवांनी ५ सीडी वापरायला सांगितल्या.
१) प्रॅक्टीस २)पेन ३)पॅशन ४)पेनल्टी ५)प्रेयर
१)प्रॅक्टिस-सातत्य-तुम्ही करीत असलेले चांगले काम सातत्याने करा.तुम्हांला जे आवडेल ते चांगले काम करा. विनयता, शिलता, शांतता, उदारता इत्यादी चांगल्या गोष्टीत सातत्य ठेवा. सापापासून दूर राहता पापापासून का दूर राहत नाही. पैशांपेक्षा मूल्य महत्वाचे आहे.अग्रक्रम निश्चित करा.
२)पेन- पिडा-कोणत्याही चांगल्या कामात त्रास होईल.अडथळे येतील, संकटे येतील ते सहन करायची मानसिकता ठेवा.कठोर परिश्रम करणाऱ्यावर लोक प्रेम करतात.ध्येय निश्चित हवे. यश आपले आहे. सहज काहीही मिळत नाही.
३)पॅशन- संयम हवा कोणात्याही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वाट पहा. घाई आणि चिंता हे पॅशन चे (संगमाचे) शत्रू आहेत.प्रतिक्षा अनंत असेल तर निकाल चांगला मिळतो, प्रतिक्षा कराण्याची मानसिकता नसेल तर रिझल्ट चांगला मिळणार नाही. थांबण्याची तयारी ठेवा.
३)पेनल्टी – चांगल्या सवयी लावण्यासाठी पेनल्टीचा उपयोग होईल. तुमच्यातील उणीवा, वाईट गोष्टी दूर करण्यासाठी पेनल्टी (दंड) घेण्याची तयारी ठेवा. मनाशी संघर्ष करा वाईट गोष्टी निघून जातील उदा. मी सिनेमा पाहणार नाही. पाहिला तर 1000 रुपये पेनल्टी देईल. मला वाटते सिनेमा पाहणे बंद होईल.
५) प्रेअर – प्रार्थना करा, मी करीत असलेल्या चांगल्या कामात भगवान मला मदत करा.गुरुदेवांच्या मार्गदर्शनाने व कृपेने सर्व चांगले होते.इनविसीबल फोर्स महत्त्वाचा आहे. तो तुमच्या कडे पाहिजे. तुम्ही चांगले काम करीत रहा. रत्नसुंदर तुमच्या मागे बसला आहे.माझ्याकडे महावीराची ताकद आहे. तुमच्या कडे आईन्स्टाईनची ताकद आहे.असे आश्वासक उद्गार रत्नसुंदरसुरीश्वरजी यांनी अमळनेर येथील रत्नप्रवाह प्रवचन मालेत काढले.या प्रसंगी गुरुदेवांनी गच्च भरलेल्या मिडटाऊन हॉल मधील भाविक स्त्री-पुरुषांना मंत्र मुग्ध केले.