अमळनेर( प्रतिनिधी)- अमळनेर येथील स्टडी सेंटर आणि पब्लिक लायब्ररी येथे आज रोटरी क्लब चे नवनियुक्त अध्यक्ष ताहा बुक वाला, बुकवाला,सचिव विशाल शर्मा(आशु नाँवेल्टी),प्रा.रोशन मावळे नेटसेट परिक्षा उत्तीर्ण झाले.प्रा.कंखरे सर नेटसेट परिक्षा ऊत्तीर्ण झाले. मोहित मावळे स्पर्धा परिक्षेत पास होऊन त्यांना महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागात( कँनल इन्स्पेक्टर) नोकरी मिळाली.अश्या गुणवंतांचा, कर्तबगारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रास्ताविकात,रियाज भाई मौलाना यांनी सांगितले की स्टडी सेंटर चे कार्य हे सर्व धर्म समाज बांधव साठी उपलब्ध आहे. बहुजन समाजातील विद्यार्थी, विद्यार्थीनींना अभ्यासासाठी कायमस्वरूपी खुले आहे.आमच्या संस्थेच्या माध्यमातून कोणत्याही विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली तर हेच आमचे यश आहे. यावेळी मार्गदर्शन करतांना शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, एस.सी. तेलेसर( ता.अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सेल. भ.वि.जा.जमाती) सोमचंद संदानशिव ( न.पा.) शरद सोनवणे सर केंद्र प्रमुख,प्रदिप कंखरे,अध्यक्ष स्थानी विचार मांडताना बन्सीलाल भागवत गुरुजी सांगितले की स्टडी सेंटर चे कार्य वाखाणण्याजोगी आहे. ज्या बुध्दांनी माणसाला माणूस शोधला हेच काम रियाज भाई यांचे काम माणूस जगमान्य झाला तर चांगली गोष्ट आहे परंतु गांव मान्य झाला पाहिजे. हा हेतू ठेवून आपले कार्य सुरू आहे. बहुजनांच्या मुलां,मुलींसाठी आपल्या माध्यमातून खूप मोठे काम केले जाते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दयाराम पाटील सर यांनी केले. आभार प्रदर्शन बापूराव ठाकरे (पत्रकार) यांनी केले. यावेळी एस.एन.डि.टी.प्राचार्य शकील शेख सर ,डॉ. रुपेश संचेती सर,फैय्याज सर,पन्नालाल मावळे, रियाज भाई मौलाना, शिवाजी पाटील,प्रदिप कंखरे.इक्बाल शेख,अमिरखाँ मिस्तरी,अहेतेशामभाई( एन.टि.एन. मोबाईल),मसुद मिस्तरी,युसुफशोला कव्वाल,रहिम मलिक, जहुर मुतवल्ली, गयास अहलेकार,रुक्नोद्दिन अहलेकार, रहिम अहलेकार,निसार शेख,फारुख खाटीक, अ.गफ्फार खाटीक, शरीफ शेख (चेअरमन अलफैज गर्ल्स, हायस्कूल.).उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन रियाज भाई मौलाना यांनी केले.