मंगळ ग्रह सेवा संस्था आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे प्रमाणित

रयतसंदेश न्युज नेटवर्क:-

अमळनेर :

धार्मिक कार्यासोबतच सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असलेल्या मंगळ ग्रह सेवा संस्थेस कुष्ठरोग पीडित रुग्णांसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नुकतेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (भारत सरकार) तर्फे प्रमाणित करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमातर्फे प्रधानमंत्री कुष्ठरोग मुक्त भारत अभियानांतर्गत विविध सामाजिक संस्था, संघटनांना कुष्ठरोग पीडित रुग्णांना पोषण आहार तसेच इतर सुविधा पुरविण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला भरीव प्रतिसाद देत मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली धुळ्यातील १० कुष्ठरोग पिढीत रुग्णांना सहा महिने पोषण आहार पुरविण्यात आला. तसेच कुष्ठरोग योग्य उपचाराअंती बरा होऊ शकतो याबाबत व्यापक जनजागर केला .
या समाजाभिमुख कार्याची दखल घेत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (भारत सरकार) तर्फे मंगळ ग्रह सेवा संस्थेस कुष्ठरोग नियंत्रण विभागाचे उपमहासंचालक यांच्या सहीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
मंगळ ग्रह सेवा संस्था ही धार्मिकच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, आरोग्य आदी विविध क्षेत्रातही भरीव व सातत्यपूर्ण कार्य करीत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page