देवगाव देवळी हायस्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदिनानिमित्ताने अभिवादन

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

अमळनेर प्रतिनिधी –
हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे असे सांगत शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे.शाळेचे जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी सांगितले.
विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के,शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, सांस्कृतिक विभाग प्रमुख आय आर महाजन, स्काऊट शिक्षक एच ओ माळी ,एस के महाजन होते.
अगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले..
इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी अर्पिता बोरसे,तनुश्री सोनवणे,कृष्णा पाटील, दहावीचे विद्यार्थी रागिणी पाटील, सोनाली महाजन, मयुरी महाजन, उन्नती गायकवाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.
त्यांच्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक एच.ओ.माळी यांनी सांगितले की आंबेडकरांचे विचार सामाजिक, धार्मिक आणि नैतिक तत्त्वांवर आधारलेले आहेत. शोषक आणि शोषित हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. दबलेल्यांना उभारी देणे आणि शोषितांची जोखडातून मुक्‍तता करणे हाच त्यांच्या विचारांचा मूलाधार आहे. सर्वांना स्वातंत्र्य, समता आणि न्याय मिळावा, हाच त्यांच्या वैचारिक मांडणीचा प्रमुख हेतू आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सांस्कृतिक प्रतिनिधी आय.आर.महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन स्काऊट शिक्षक एस.के महाजन यांनी केले. यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page