अमळनेर येथे स्व.अजितदादा यांच्या अस्थिकलशाचे दर्शन,रथयात्रा काढून पाडळसरे धरणावर अस्थि विसर्जन.!

अमळनेर प्रतिनिधी – रयत संदेश न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचा अस्थी कलश आज मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता अमळनेरात दाखल होत असून शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात अस्थिकलशाचे दर्शन घेता येणार आहे.

त्यानंतर कलशाची रथयात्रा काढुन पाडळसरे धरणावर अस्थिकलश विसर्जन होणार आहे.जनसेवेचे व्रत जीवनभर जपणारे, लाखोंच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे लाडके नेते स्व. अजितदादा पवार आजही स्मृतींमधून मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेऊन कृतज्ञ अंतःकरणाने नतमस्तक होण्याची ही भावनिक वेळ असल्याने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व दादा प्रेमींनी आज मंगळवारी दुपारी 3 ते 4 वाजे दरम्यान दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात उपस्थित राहावे.यानंतर अस्थिकलश रथयात्रा अमळनेर- धार- मारवड- कळमसरे- पाडळसरे मार्गे पाडळसरे धरण येथे पोहचेल व पाडळसरे धरण येथे अस्थि विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page