*F-Zone क्रीडा स्पर्धेत चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा बास्केटबॉलमध्ये विजय.

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

दि.३१/०१/२०२६ वार शनिवार रोजी किसान विद्या प्रसारक संस्था (KVPS), शिरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या F-Zone क्रीडा स्पर्धेत महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग & पॉलिटेक्निक), चोपडा महाविद्यालयाच्या बास्केटबॉल संघाने घवघवीत यश मिळवले आहे.

या स्पर्धेत चोपडा महाविद्यालयाच्या संघाने जीएमसी पॉलिटेक्निक शहादा या प्रतिस्पर्धी संघावर ६–५ अशा अटीतटीच्या फरकाने मात करत विजेतेपद पटकावले. विजयी संघात गुणवंत सावळे, हर्षल भोई, मयूर सुतार, दीपक बडगुजर, यश अहिरे, द्रोणाचार्य कोळी, मोहित माळी व मयूर भोई या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव मा. ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.व्ही. एन. बोरसे,यांनी विजयी संघाचा सत्कार करून अभिनंदन केले व त्यांच्या भावी क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या संघाला प्रा.एस.एम.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या मेहनतीमुळे आणि मार्गदर्शनामुळे हे यश संपादन झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.प्रसंगी सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page