अमळनेर (प्रतिनिधी )
येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व देशातील सर्वात मोठी आणि क्रमांक एकची पत्रकार संघटना अर्थात व्हॉईस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या सातव्या नवव्या व अकराव्या दिवशी निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांचे दगडी दरवाजासमोर स्वागत होणार आहे. मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हॉइस ऑफ मीडिया या दोन्ही संस्था प्रत्येक गणेश मंडळाला फ्रेम केलेले सन्मानपत्रही देणार आहे ,असे दोन्ही संस्थांच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे.