रयतसंदेश न्युज नेटवर्क:-
अमळनेर प्रतिनिधी
हिंदी ही केवळ भारताची राष्ट्रभाषा नाही तर ती देशाच्या अस्मितेचं आणि अभिमानाचं प्रतीक आहे. दरवर्षी भारत 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिन साजरा करतो. हा दिवस हिंदी भाषेचं महत्त्व दर्शवतो आणि तरुण पिढीला ही भाषा अधिकाधिक अंगीकारण्याची प्रेरणा देतो.असे महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये अध्यक्षीय भाषणातून शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन बोलत होते..
विचारपीठावर शिक्षक अरविंद सोनटक्के, एच.ओ.माळी, एस.के.महाजन होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले..
राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्ताने हिंदी शिक्षक आय.आर.महाजन यांनी वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन केले.. परीक्षक म्हणून शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले..
हिंदी शिक्षक आय.आर महाजन यांनी प्रस्ताविक करतांना सांगितले की
१४ सप्टेंबरपासून एक आठवडा हिंदी सप्ताह साजरा केला जातो. या आठवड्यात आमच्या शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
केवळ हिंदी दिवसापुरते मर्यादित न राहता लोकांमध्ये हिंदी भाषेच्या विकासाची भावना वाढवणे हा त्याचा मूळ उद्देश आहे असे त्यांनी सांगितले..
वकृत्व स्पर्धेमध्ये एकूण शाळेतील आठवी ते दहावीतील 30 मुलांनी सहभाग नोंदवला
*वत्कृत्व स्पर्धेचा निकाल*
प्रथम इयत्ता दहावीतील सोनाली महाजन द्वितीय इयत्ता आठवीतील कृष्णा अशोक पाटील, तृतीय इयत्ता नववीतील गिरीजा माळी, उत्तेजनार्थ बक्षीस अर्पिता बोरसे इयत्ता आठवी, मयुरी महाजन इयत्ता दहावी या विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात हिंदी शिक्षक ईश्वर महाजन यांच्या तर्फे बक्षीस दिले जाणार आहेत..
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन हिंदी विषय शिक्षक आय आर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस के महाजन यांनी मानले.. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला..