जळगांव जिल्हा प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
जळगांव (प्रतिनिधी) – येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै.सौ. जयमंगलाबाई प्रभाकर कुळकर्णी प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात इ.१ली ते ४ थी तसेच इ.३ री एमटीएस व इ.४ थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्ज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अँड.श्री.सुशीलदादा अत्रे हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.अभिजीतदादा देशपांडे,समन्वयिका सौ.प्रियाताई देशपांडे, श्रीमती रजनी पाठक, सौ लताताई छापेकर, मुख्याध्यापक श्री. जितेंद्र वानखेडे, सौ. अपर्णा मुळे हे होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा चंद्रात्रे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नंदकिशोर ढोले तर आभार श्रीमती उज्ज्वला पवार यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता सौ.वृषाली ढोले व सौ.मनीषा भामरे यांनी पसायदान म्हणून केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




