*”साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर या शाळेत राज भाषा हिंदी ओलम्पियाड परीक्षा संपन्न”* अमळनेर: दिनांक १४ /७/ २०२६ वार मंगळवार रोजी साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळ नेर या शाळेत महात्मा गांधी राजभाषा हिंदि प्रचार संस्था पुणे अंतर्गत राजभाषा ओलम्पियाड संपन्न झाली.कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव दादासाहेब श्री. संदीप घोरपडे हे अध्यक्ष स्थानी होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. कौस्तुभ पाटील हे होते.
त्याच प्रमाणे व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम उपस्थितीत होत्या. श्रीमती बोरसे मॅडम यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींचे कौतुक केले कि तुम्ही शाळेच्या स्पर्धा परीक्षेत सहभागी होतात व शाळेचे नाव उज्वल करतात. तुम्ही खऱ्या अर्थाने हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करत आहात प्रमुख पाहुणे श्री. कौस्तुभ पाटील यांनी विद्यार्थीनींना रोज महान व्यक्तींचे पुस्तकाचे किमान 15 पान वाचत चला व आठवड्यातून एक पुस्तकं वाचा व आत्मसाथ करा फोन वर प्रताप कॉलेजचे हिंदी विभाग प्रमुख मा. श्री. डॉ. प्रा . कुमावत यांनी विध्यार्थीनीना शुभेच्छा दिल्या व तुम्ही त्या स्पर्धापरीक्षेत भविष्यात सामील व्हा असा मौलिक सल्ला दिला. अध्यक्ष श्री. दादासाहेब संदीप घोरपडे यांनी आपल्या भाषणात विध्यार्थीनींचे कौतुक केले व हिंदी परीक्षा का महत्वाच्या असता याचे महत्व पटवून दिले. एकूण १२० विध्यार्थीनी बसल्या होत्या. ह्या परीक्षेसाठी संस्थेचे अध्यक्ष मा . आबासाहेब श्री हेमकांत पाटील व सर्व संचालक मंडळांनी शुभेच्छा दिल्या .परीक्षेसाठी मार्गदर्शन हिंदी शिक्षक श्री. दिलीप पाटील यांनी केले. परीक्षेसाठी सहकार्य शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री.जे. एस. पाटील,श्री. आर. एम देशमुख, श्री. मुकेश पाटील,श्री. दीपक महाजन यांनी केले सूत्रसंचालन श्री. दिलीप पाटील सर व आभार श्री. मुकेश पाटील यांनी मानले.




