साने गुरुजी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परीक्षेत दैदीप्यमान यश

अमळनेर (प्रतिनिधी): रयत संदेश न्यूज नेटवर्क

येथील साने गुरुजी विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध शालेय व स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत हितांश निंबा पाटील याने अमळनेर शहरी भागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर योगांक्षी संजीव पाटील हिने शहरी भागातून तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. तसेच प्रांजल सुरेश मोरे हिने तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवण्यासोबतच हितांश निंबा पाटील या विद्यार्थ्याने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्ह्यात प्रथम रँक पटकावण्याची विशेष कामगिरी केली आहे. तसेच तो सैनिकी शाळेच्या प्रवेशासाठी सुद्धा पात्र झाला आहे

*ऑलिम्पियाड आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील यश*:-

इंडियन ऑलिम्पियाड परीक्षेत चेतना तुषार नाथबुवा हिने राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक, तर कनिष्क किशोर गवळी याने राज्य गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक मिळवला.भार्गव गोविंदा माळी आणि विराज विनोद पाटील या दोघा विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल (सुवर्णपदक) पटकावले, तर प्रणव विलास महाले याला ‘एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले.

*एमटीएस मंथन जनरल नॉलेज परीक्षा*: वेद पुरुषोत्तम पाटील हा विद्यार्थी केंद्रातून दुसऱ्या क्रमांकाने, तर शौर्य अमोल सातपुते हा विद्यार्थी केंद्रातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

*संस्थेकडून कौतुकाचा वर्षाव*:

विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री हेमकांत पाटील, सचिव श्री संदीप घोरपडे, ज्येष्ठ संचालक श्री गुणवंतराव पाटील, सहसचिव अॅड.अशोक बाविस्कर, किरण पाटील, प्रा. डॉ. शेख यांच्यासह मुख्याध्यापक संजीव पाटील आणि शिक्षकवृंदानी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page