शारदा माध्यमिक विद्यालयात हिंदी राजभाषा परीक्षा उत्साहात…
…..अमळनेर तालुक्यात विविध गुणवत्तापूर्ण कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणारी शाळा असा उल्लेख होतो अशा शाळेत हिंदी विषयावर परीक्षा संपन्न. ह्या परीक्षेसाठी 222 विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांनी हिंदी विषयाचा अभ्यास करून हि परीक्षा दि. 26/7/2023 हया दिवशी दिली. हिंदी अध्यापक एम. आर. तडवी यांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी आनंदाने, तणावरहित वातावरणात परीक्षा देत होते. परीक्षेचे नियोजन आर. जी. राठोड यांनी तर एस.एच. भवरे सर यांनी मूल्यमापन केले. शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी विद्यार्थ्यांचे परीक्षेला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानले..प्रशासकीय अधिकारी जी. टी. टाक यांचे अनमोल सहकार्य लाभले..
हिंदी राजभाषा परिक्षा उल्लेखनीय उपक्रम
