स्वयंसिध्दा राष्ट्रीय पुरस्कार शिवमती.पुनम ठाकरे यांना जाहीर.
नाशिक:- नासिक येथील दर्पणकार बाळशास्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्वयं सिद्धा राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे सर यांनी केले असून यात अंमळनेर येथील शिवमती पुनम बापूराव ठाकरे यांच्या पत्रकारिता करता व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ रविवार दि.9 मार्च 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता या रोटरी क्लब हॉल, गंजमाळ ,शालीमार, नाशिक या ठिकाणी आयोजित केला असून हा कार्यक्रमास मा.लिना बनसोडे व्यवस्थापकीय संचालक, अदिवासी विकास मंडळ, नासिक. मा.मनीषा खत्री आयुक्त मनपा नासिक. डॉ. जानकी पराग नाईक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ग्राहक रक्षक समिती. मा. माननीय माया निवृत्ती काळे मॅडम उद्योजिका नाशिक. मा. पूजा राजेश कदम उद्योजिका नाशिक. मा. कविता राऊत ऑलम्पिक धावपटू नाशिक. मा. स्वाती भामरे प्रदेश उपाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र राज्य. विशेष उपस्थिती मा.नितल शितोळे- सरकार ,लोकप्रिय अभिनेत्री. मा. संगीता गायकवाड अध्यक्ष, शिखर स्वामिनी महिला संस्था मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे विविध क्षेत्रात उल्लेखनी कार्य करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे यामध्ये शिवमती पुनम बापूराव ठाकरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. शिवमती पुनम बापूराव ठाकरे (संपादक -साप्ताहिक रयतजगत)या अंमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयाचे उपशिक्षक तथा शिवरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पत्रकार ,मराठा सेवा संघाचे सचिव शिवश्री बापूराव आनंदराव ठाकरे पाटील यांच्या सुविद्य पत्नी असून त्यांना हा पुरस्कार पत्रकारिता आणि सामाजिक कार्यासाठी दिला जात आहे .या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मा. डॉ. महेंद्र देशपांडे राष्ट्रीय अध्यक्ष बी.जे.पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page