एरंडोल येथे राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद यशस्वी रित्या संपन्न.

रयतसंदेश न्युज :-

अमळनेर ( प्रतिनिधी) : एरंडोल येथे राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद पार पडली. या परिषदेत महत्त्वाचे असून १० ठराव संमत करण्यात आले.या ठरावात भारत सरकारने भारतीय संविधानाला अधिकृतपणे राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावे, संविधानाचा भारतीय अवमान करणाऱ्या व्यक्तीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून शासनाने अधिकृतपणे घोषित करावे, देशातील सर्व माध्यमाच्या शालेय व महाविद्यालयीन सर्व शाखांच्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय संविधानाचा अंतर्भाव करण्यात न्यायालयात संविधान साक्षीने शपथ देण्यात यावी, अशा महत्त्वाच्या ठरावांचा समावेश आहे. संविधान सम्मान परिषदेत ठराव संमत केले. सन्मान परिषदेच्या यशस्वीतेसाठी माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड, प्रा. भरत शिरसाठ, भैय्यासाहेब सोनवणे, डॉ. संदीप कोतकर, राजेंद्र पारे, धनराज अहिरे, बापूराव शिरसाठ, धनराज मोतीराय, अश्विनी गोसावी, पी. डी. पाटील, लक्ष्मण पाटील, उषाकिरण खैरनार, राजेंद्र वाघ, रणजित सोनवणे, सुनील खैरनार, भगवान ब्रम्हे, सुमन बिऱ्हाडे, विनोद रंधे, चिंतामण जाधव, उषाताई बाविस्कर, जे. पी. सपकाळे, उज्ज्वला पारेराव, नलिनी सन्नाशिव, सुरेश सोनवणे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या संविधान परिषदेत शेकडो संविधानप्रेमींनी हजेरी लावली होती. सर्व ठराव एकमुखाने संमत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page