बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी प्रताप हायस्कूल माजी.मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल.*

 

अमळनेर: प्रताप हायस्कूल अमळनेर येथील माजी.मुख्याध्यापिका प्रमोदिनी बळीराम पाटील यांनी शासकीय सेवेत कार्यरत असतांना, शासकीय योजनांचा लाभ घेणेसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे अनेक शासकीय योजनांचा लाभ घेतल्याप्रकरणी अमळनेर सत्र न्यायालयात कलम १५६(३) अन्वये, अर्ज सादर केलेला होता. त्यावर अंतिम सुनावणी होऊन, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष, योगेश पवार रा. पैलाड, अमळनेर यांनी सदर तक्रारी सोबत जेकाही आवश्यक असे कायदेशीर पुरावे होते. ते सदर तक्रारी सोबत दाखल असल्यामुळे अमळनेर येथील प्रथम वर्ग न्यादंडाधिकारी वर्ग १ यांनी सदर तक्रारीची दखल घेऊन, आरोपींविरुद्ध अमळनेर येथील पोलिसांकडे गुन्हा दाखल करून घेऊन, तपासाचे आदेश पारित केलेले आहेत. कलम, ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८ व ४७१ अन्वये, फौजदारी खटला दाखल करण्यात आलेला आहे. सदर निर्णयाने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर लाभ घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील अँड. अमोल साळोक यांच्या मार्गदर्शनाखाली अँड.गणेश सोनवणे जळगांव व अँड.किशोर पाटील अमळनेर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page