रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर प्रतिनिधी-
प्रताप महाविद्यालयामध्ये दिनांक ३१ डिसेंबर रोजी यीन ची निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये चार यात उमेदवार रिंगणात होते, जनार्दन पाटील, आकाश साळवे, भाग्यश्री महाले, जयेश चौधरी. त्यात २५२ विद्यार्थ्यांनी मतदान नोंदणी केली होती त्या पैकी २३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, २ जानेवारी रोजी निकाल घोषित केला असून त्यात जनार्दन पाटील विजयी झाले.
उमेदवारांना मिळालेली मते- जनार्दन पाटील (बाबाजी) १८२, आकाश साळवे ४८, जयेश चौधरी ०१, भाग्यश्री महाले ० यात विजयी उमेदवार जनार्दन पाटील यांचा चार पट मताधिक्क्याने विजयी झाला असून त्या नंतर प्रताप महाविद्याल व आमदार कार्यालयाला येथे मोठा जल्लोष बघायला मिळाला. जनार्दन पाटील यांच्या विजयी जल्लोषात राष्ट्रवादी कार्यालय येथे आमदार पाटील यांच्या सह महायुती कार्यकर्ते, पदाधिकारी आधींनी ठेका धरला.
जनार्दन पाटील यांची निवड झाल्याबद्दल आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, मा.जि.प.सदस्या जयश्री पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाने, राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशसचिव सुनील शिंपी, राष्ट्रवादी विद्यार्थी मा.अध्यक्ष सनी गायकवाड, तालुकाध्यक्ष यशोदीप पाटील, शहराध्यक्ष कृष्णा बोरसे, निखिल पाटील, बीन धीरज माळी, वेद पाटील, दुर्गेश पाटील, कुलदीप पाटील, कुणाल पाटील, हिझैफा पठाण, प्रणव पाटील, सोशल मीडिया शहराध्यक्ष रोहित सूर्यवंशी, जयेश देवरे, प्रणव चौधरी, भूषण लोहार, शामकांत पाटील, आदित्य पाटील, मयूर बोरसे, प्रेम मोरे, रोहित शिसोदे यांनी अभिनंदन केले.