लोकशाहिर,साहित्य सम्राट,अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव निमित्त, 201 व्याख्यानांच्या अभिनव उपक्रम.

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

अमळनेर( प्रतिनिधी )अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान, संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत अंमळनेर तालुक्यात 101 व्याख्याने, धरणगाव तालुक्यात 50, पारोळा तालुक्यात 50 अशा अभिनव उपक्रमाचे आज उद्घाटन अण्णाभाऊ साठे चौकात डफ वादक कलावंत आदरणीय, लोटन सखाराम पवार यांच्या हस्ते दिमाखात करण्यात आले .अण्णाभाऊंनी आपल्या गीतातून कष्टकऱ्यांना समाज कारण व राजकारणात सक्रिय येण्याची एक हाक दिली समाज परिवर्तन आधारित तळमळ आणि विचारांची स्पष्टता त्यातून निर्माण झालेले साहित्य केवळ मनोरंजन नव्हे तर समाज प्रबोधनाचा ध्यास होता असे उद्गार युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी काढले अण्णाभाऊ साठे चौकात प्रतिमापूजन केल्यानंतर जयंती कार्यक्रमात बोलत होते. 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंती दिनी युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचलित *राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान* अंतर्गत एकाच दिवशी 201 वक्ते अंमळनेर ,पारोळा धरणगाव येथे प्राथमिक, माध्यमिक, शाळांमध्ये व्याख्याने देऊन अण्णाभाऊंच्या जीवनपट सुमारे 50 हजार विद्यार्थ्यां समोर ठेवण्याचा ऐतिहासिक उपक्रम जळगाव जिल्ह्यात राबवित आहेत, त्यात तीनही तालुक्यात प्रथमतः अभियानापूर्वी वक्त्यांनी कार्यशाळा घेण्यात आली .यामध्ये मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. राहुल निकम. समाज कार्य महाविद्यालय चोपडा, धनदाई महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ.लिलाधर पाटील सर व शिवश्री.रामेश्वर भदाणे सर यांनी मार्गदर्शन केले प्रा. अशोक पवार यांनी अण्णाभाऊ साठे व्यक्ति, व्यक्तिमत्व, कर्तुत्व या विषयावर तयार केलेले वाचन साहित्य सर्व वक्त्यांना देण्यात आले. या वक्त्यांमध्ये प्राथमिक, माध्यमिक शाळांचे शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे .प्रत्येक शाळेवर दुसऱ्या जवळच्या शाळेचे वक्ते शिक्षक पाठविण्यात आले या विनियोजनात पारोळा गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील साहेब, धरणगाव गटशिक्षणाधिकारी भावनाताई भोसले ,अंमळनेर गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील ,यांचा आणि सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांच्या सहभाग मिळाला पारोळा 50 व्याख्याने, धरणगाव 50 व्याख्याने ,अंमळनेर 101 व्याख्यानांचे नियोजन करण्यात आले होते हा महाराष्ट्रातील एकमेव अभिनव उपक्रम असल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली आहे या उपक्रमासाठी काही खर्च येत नाही. सर्व वक्ते कार्यकर्ते स्वखर्चाने धडपड करत असतात. धरणगाव तालुक्याचे संयोजक डी.ए .पाटीलसर होते तर पारोळा संयोजक म्हणून रामेश्वर भदाणे यांनी काम पाहिले. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे प्रमुख म्हणून शिवश्री.बापूराव आनंदराव पाटील (ठाकरे सर )यांनी मेहनत घेतली.
अण्णाभाऊ साठे चौकामध्ये उद्घाटन प्रसंगी नारायण फकिरा गावंडे .हरिचंद्र शिवराम कढरे ,सम्राट थोरात, कांतीलाल गरुड ,डॉ.राजू हिरामण कांबळे, प्रकाश नाना गरुड, अनिल तुळशीराम गरुड ,राहुल गरुड, संतोष बिर्हाडे साहेब (न.पा.) प्रा. डॉ. विजय गाढे, समाधान मैराळे,संभाजी देवरे नूरदादा खान, सुरेश कांबळे,हितेश बडगुजरउमाकांत ठाकूर, सोपान भवरे, योगेश पाने सर,प्रशांत शिरसाट, संदीप पाटील जवखेडा ,ऍड.कौस्तुभ पाटील ,कांबळे सर ,जितू कढरे ,बाळा अवचित्ते, प्रवीण शिरसाट,अजिंक्य चिखलोदकर, भाविका वाल्हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page