निधी आपके निकट २.०” उपक्रम चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयात उत्साहात.

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

अमळनेर (प्रतिनिधी ) – महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित, श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन,चोपडा येथे कर्मचारी भविष्य निधी क्षेत्रीय कार्यालय (EPFO) जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन दिनांक २७.०८.२०२४ वार मंगळवार रोजी करण्यात आले.

कर्मचारी भविष्य निधी कर्मचारी बिमा निगम कायद्यांतर्गत भविष्य निधीशी निगडीत समस्या निवारणासाठी सदरील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमात चोपडा तालुक्यातील विविध आस्थापनाचे प्रतिनिधी,कर्मचारी,पेन्शनर्स उपस्थित होते,कार्यक्रमात सर्वाना भविष्य निधी कायदा व नवीन तंत्रप्रणाली याविषयी प्रवर्तन अधिकारी श्री रमण पवार यांनी माहिती दिली तसेच श्री रमण पवार साहेब त्यांच्यासोबत असलेले सामाजिक सुरक्षा सहाय्यक श्री योगेश मदनकर व श्री हितेश जगताप यांनी मिळून सर्वांच्या अडचणी ,शंका विचारात घेऊन लोकांच्या प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यात आल्या, हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार करण्यासाठी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री व्ही एन बोरसे यांनी पुढाकार घेतला.अश्या तालुकावासियांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अँड श्री संदीप सुरेश पाटील व मा. सचिव डॉ स्मिताताई संदीप पाटील यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page