रयतसंदेश न्युज नेटवर्क:-
अमळनेर (प्रतिनिधी) – दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी जळगाव तालुक्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत घेण्यात आली.
सदर सभेला गटशिक्षणाधिकारी सरला पाटील, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, नवोदय विद्यालय शिक्षिका मीना सरनाईक, सुशील पवार यांचे सह सर्व केंद्र प्रमुख उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी सरला पाटील यांनी महावाचन चळवळ व विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षेबाबत करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार यांनी सखी सावित्री समिती स्थापन करणे व दर्जेदार पोषण आहार देणे, सर्व अभिलेखे दररोज नियमित करणे या सूचना दिल्या. शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख यांनी शिष्यवृत्ती परीक्षा , मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना टप्पा क्र- 2, राबवणे,सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवणे इत्यादी संबंधी मार्गदर्शन केले.केंद्र प्रमुख सुशील पवार यांनी निपुण भारत अभियान बाबत सविस्तर माहिती दिली. मीना सरनाईक यांनी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे आवाहन केले.सभेला जळगाव ग्रामीण व शहरी भागातील सुमारे तीनशे मुख्याध्यापक उपस्थित होते.सभेच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले,सर्व केंद्रप्रमुख आणि गट साधन केंद्रातील सोपान पाटील,जितेंद्र सोनवणे ,मनोज शेळके,अरुण संध्यान, गोपाल सहारे, भरत पाटील, जीभाऊ गर्दे यांनी परिश्रम घेतले.