रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर (प्रतिनिधी)
साळवे इंग्रजी विद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रभाषा हिंदी चे महत्व या विषयावर प्रबोधनात्मक भाषणे केली. हर देश की पहचान उस देश की भाषा और संस्कृती से होती है। हिंदी को संविधान के द्वारा राष्ट्रभाषा के रूप मे स्वीकृत किया गया। इसके स्मृतीस्वरूप हिंदी दिवस मनाया जाता है। ऐसा कहा। काही विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेविषयी अतिशय सुंदर गीत-गायन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षक जी व्ही नारखेडे यांनी सांगितले की आपल्या देशात विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात परंतु हिंदी राष्ट्रभाषेमुळे संवाद साधणे व एकोपा प्रस्थापित करणे शक्य होते. वक्त्या म्हणून गुणवंती पाटील यांनी १४ सप्टेंबर १९४९ या दिवसापासून हिंदीला राष्ट्रभाषेची मान्यता देण्यात आली व तिला विश्वभाषा म्हणून सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे असे सांगितले. याप्रसंगी मुख्याध्यापक एस डी मोरे, ए वाय शिंगाणे, व्ही के मोरे, एस पी तायडे, एस व्ही राठोड, सौ.प्रतिभा पाटील, पौर्णिमा वारके, वर्षा नेहेते, दिगंबर पाटील व हिंदी विभाग प्रमुख रंजना नेहते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सना निसार पटेल हया दहावीच्या विद्यार्थिनीने केले. आभार प्रदर्शन बी आर बोरोले यांनी केले.