रयतसंदेश न्युज नेटवर्क:-
अमळनेर (प्रतिनिधी )- येथील साई इंग्लिश अकॅडमितर्फे विद्यार्थ्यांसाठी पुस्तक व लेखकओळख स्पर्धेचे आयोजन करण्याचेनिश्चित केले आहे.शासनानेअमळनेरला पुस्तकांचे गाव म्हणूननुकतेच घोषित केले आहे,त्यातूनच
साई इंग्लिश अकॅडमिचे संचालकभैय्यासाहेब मगर यांना सदर कल्पनासुचली आहे, त्यातून विद्यार्थ्यांना पुस्तकांची व लेखकांची ओळख होणार आहे, त्यांच्या या उपक्रमाचे
सर्वत्र कौतुक होत आहे.विद्यार्थ्यांना 50 निवडकपुस्तकांची व लेखकांची यादी द्यायची आणि त्यावर ही स्पर्धा घ्यायची.त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना
पुस्तकांची व त्यांच्या लेखकांची नावे कळतील व भविष्यात विद्यार्थी ते पुस्तके वाचतील अशी अपेक्षा स्पर्धेचे आयोजक भैय्यासाहेब मगर यांनी केली आहे, लवकरच या स्पर्धा घेण्यात येणार आहेत, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सदर उपक्रम हाती घेण्यात आला आहे.