रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर (प्रतिनिधी ) आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती निसर्ग मंगल कार्यालय पुणे येथे सुरु आहेत. त्यात अमळनेर येथील भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे डॉ. अनिल शिंदे यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या कडे सादर केला आहे. हा निर्णय घेण्या मागे कोण आहे. डॉ. अनिल शिंदे यांच्या विषयी माहिती देतांना प्रा. अशोक पवार इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) यांनी पुराव्यानिशी सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली हे महत्त्वाचे आहे.त्यामुळे अमळनेर च्या विधानसभा निवडणुक भविष्यात डॉ अनिल शिंदे कोणत्या पक्षाचे संभाव्य उमेदवार असु शकतात अशी आश्चर्यचकीत घटना घडली तर नवल वाटायला नको ? या मुळे मतदारसंघात नवनवीन चर्चेला उधाण आले आहे.