रयत संदेश न्यूज नेटवर्क –
अमळनेर येथे SIR संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.बैठकीत SIR प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी, मतदार यादीची अचूक पडताळणी, नव्या मतदारांची नोंदणी, नावांमधील आवश्यक दुरुस्त्या, बूथनिहाय नियोजन तसेच प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करत मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बूथ हा पक्ष संघटनेचा कणा असून, प्रत्येक बूथ अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी संघटनात्मक बांधिलकीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. आगामी काळात प्रत्येक बूथवर अधिक सक्रिय, शिस्तबद्ध आणि परिणामकारक कार्य करून संघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.
यावेळी पातोंडा मंडळ प्रभारी श्री.पी.सी. आबा पाटील, जानवे मंडल प्रभारी श्री मधुकरभाऊ काटे,शहर मंडळ प्रभारी श्री.सुरेन्द्र भाऊ बोहरा तसेच जानवे मंडलाध्यक्ष श्री जिजाबराव पाटील, पातोंडा मंडल अध्यक्ष राहुलदादा पाटील, अमळनेर शहर मंडल अध्यक्ष श्री.योगेश महाजन
मा. जि. प.सदस्य श्री व्ही आर आप्पा पाटील, मा.प.स.सभापती श्री. श्याम बापू अहिरे, मा.जि.प.सदस्य श्री.संदीप भाऊ पाटील, माजी तालुकाध्यक्ष श्री. हिरालाल आप्पा पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…



