रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर (प्रतिनिधी)-
देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मध्ये भारतरत्न ,थोर शास्रज्ञ ,माजी राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त
“वाचन प्रेरणा ” दिवस साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व विशद करतांना मुख्याध्यापक
अनिल महाजन म्हणाले की,”एखादा विषय अथवा विचार समजून घेण्यासाठी वाचनाची सवय महत्वाचीभूमिका बजावत असते.वाचन ,चिंतन,मनन हे टप्पे ओलांडत वाचनाने विचार व आचरणात बदल होतो ” असे शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले..
विचारपिठावर शाळेचे शिक्षक आय.आर महाजन,एच.ओ.माळी,एस.के.महाजन, अरविंद सोनटक्के होते..
डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले..
यावेळी शाळेच्या ग्रंथालयातून
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची पुस्तक वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली.. विद्यार्थ्यांना आवडीची पुस्तके त्यांनी एकाग्र चिंतन करून वाचले..
महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था पुणे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या परीक्षांचा निकाल घोषित करण्यात आला. यावेळी आठवी व दहावी च्या विशेष गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी सन्मानित केले..
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय आर महाजन यांनी केले.. आभार प्रदर्शन एस के महाजन यांनी मानले तर फलक लेखन स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी यांनी केले..कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी संभाजी पाटील, गुरूदास पाटील यांनी प्रयत्न केले..