राज्यस्तरीय सेवानिवृत्त पुरस्कार श्री. चिंधु ओंकार वानखेडे व श्री. सर्जेराव पाटील अमळनेरकर यांना प्रदान .

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

दिनांक 3/2/2026 श्री क्षेत्र नर्सि नामदेव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी महाराष्ट्र पेन्शन असोसिएशन, पुणे यांच्यामार्फत देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट पेन्शनर पुरस्कार अमळनेर येथील सेवानिवृत्त सन्माननीय केंद्रप्रमुख श्री चिंधु ओंकार वानखेडे व अमळनेर येथील सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक श्री सर्जेराव पाटील यांना राज्य पेन्शनर मंडळाचे अध्यक्ष श्री एन डी मारणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या पुरस्कारात सन्मानचिन्ह ,मानपत्र व 500 रुपये रोख असे देण्यात आले

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सदाशिव सोनवणे तालुकाध्यक्ष हिम्मतराव. पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य धनराज पाटील, यादव सिनकर. जिल्हा कार्यकारिणीतील जगदीश महाजन ,आयुबशहा जमालशहा गोपीचंद सोनवणे, साहेबराव पाटील तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, वसंत पाटील, प्रकाश साळुंखे, जगदीश महाजन, काथेराम परदेशी, गंगाधर पाटील ,बारकू पाटील या सन्माननीय सदस्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page