अमळनेर विधानसभा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करा- मा.नगरसेवक शाम पाटील

रयतसंदेश न्युज नेटवर्क:-

अमळनेर( प्रतिनिधी) -मतदारसंघात गेल्या दोन महिन्यापासून सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून पिके सडून गेली आहेत. शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे, याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्वरित पंचनामे करावे व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी नागरिक दक्षता समितीने आयोजित केलेल्या धरणे आंदोलन प्रसंगी माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी केली. अध्यक्षस्थानी नागरी हित दक्षता समितीचे अध्यक्ष प्रा अशोक पवार होते.
शेतमालाची शासकीय खरेदी झाली पाहिजे, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क माफ करा, सरकारी नोकरी भरती करून रिक्त पदे त्वरित भरा., महिलांच्या सुरक्षेत वाढ करा, पीक विम्याचे पैसे त्वरित द्या ,अमळने तालुक्यात 2021 ला झालेली नुकसान भरपाई त्वरित द्या ,पाडळसे धरणाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करा, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी ,कंत्राटी ,कायम कर्मचारी यांचे मानधन, वेतन त्वरित द्या,पी.एम किसान योजनेचे पैसे त्वरित द्या, जुनी पेन्शन लागू करा, याही मागण्यांचा समावेश धरणे आंदोलनात होता .नायब तहसीलदार श्री लोंढे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. डी ए पाटील यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
लाडक्या बहिणीच्या मेळाव्यासाठी शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता आली असती., पाडळसे धरणाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश न करणाऱ्या मंत्री अनिल पाटील यांचा धरणे आंदोलनात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दहा वर्षात सूतगिरणी सुरू केली नाही तर सुतगिरणी विकून टाकली ही धक्कादायक माहिती व्यासपीठावरील मान्यवरांनी सांगितली. शिरीष चौधरी व अनिल भाईदास पाटील यांनी शेतकरी, कष्टकरी ,आदिवासी ,महिला, युवा, अल्पसंख्यांक, गरीब यांच्यासाठी काहीही केलेले नाही असेही विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रा.अशोक पवार, बन्सीलाल भागवत, सुभाष जी भाऊ, डॉ अनिल शिंदे ,विश्वास पाटील, अँड. ललिता पाटील ,तिलोत्तमा पाटील,गणेश पवार, मनोहर नाना, अरुण देशमुख, भागवत सूर्यवंशी ,शिवाजी दौलत पाटील, धनगर आण्णा ,संजय पुनाजी पाटील, गोकुळ आबा आदी मान्यवरांची सरकारच्या व मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या नाकर्तेपणावर अभ्यासपूर्ण भाषणे केली ,दिवसभर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला अमळनेर विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. याप्रसंगी आरती पाटील, डी एम पाटील ,परेश शिंदे, प्रवीण देशमुख, प्रताप पाटील, त्रंबक मोठा भाऊ ,मनोज पाटील ,गजेंद्र पाटील, दिलीप पाटील, पी वाय पाटील, श्रीकांत पाटील, अक्षय चव्हाण, दर्पण वाघ, यतीन पवार, अनिरुद्ध शिसोदे ,प्रशांत निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page