*गोंडगाव येथील बालिकेच्या मारेक-यास फासावर लटकवा..मराठासेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडची मागणी*(जळगांव ).
अमळनेर प्रतिनिधी :- बापूराव ठाकरे.
गोंडगांव ता.भडगाव येथील ९,वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन तिची दगडांनी ठेचून निर्घुण हत्या करण्यात आली आहे.या अमानुष घटनेने समाजमन हेलावून गेले आहे सर्वदूर याचे तिव्र पडसाद ऊमटत आहेत.याबाबत मराठासेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पोलिस अधिक्षक यांना लेखी निवेदनासह आरोपीला तात्काळ फासावर लटकविणेसाठी आरोपीविरुध्द सबळ पुराव्यांसह लवकर चार्जशिट न्यायालयात द्यावे,सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा,खटला चालविणेसाठी सरकारी वकिल ऊज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी,बालिकेच्या कुटुंबास पोलिस संरक्षण मिळावे,बालिकेच्या कुटुंबास शासनाकडून त्वरीत आर्थिक सहाय्य करावे.या मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी मराठासेवा संघाचे सुरेंद्र पाटील,राम पवार,सुरेश पाटील,प्रमोद पाटील,हिरामण चव्हाण,प्रा.राजेंद्र देशमुख,चंद्रकांत देसले,सचिन पाटील,मधुकर पाटील,ज्ञानेश्वर साळूंखे,राजेंद्र पाटील जिजाऊ ब्रिगेडच्या लिना पवार,ज्योती पाटील,सुचिता पाटील, कांचन पाटील,मनिषा पाटील,करुणा गरुड,गितांजली देसाई जयश्री पाटील,स्मिता शिसोदे आदि पदाधिकारी ऊपस्थित होते.