सेवानिवृत्त मुख्या. विलासराव पाटील यांचा ओ.बी.सी. शिक्षक असोसिएशनच्या वतीने सत्कार समारंभ.
अमळनेर प्रतिनिधी :- बापूराव ठाकरे.
ओ. बी. सी शिक्षक असोसिएशन हि पुरोगामी चळवळीत योगदान देणारी व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्येला पर्याय देणारी संघटना आहे. ह्या संघटनेचे संस्थापक श्री विलास पाटील हे नुकतेच निवृत्त झाले. त्यांच्या सेवासांगता निमित्त जळगाव ओ.बी. सी , शिक्षक असोसिएशन मार्फत
कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रम साने गुरूजी वाचनालयात घेण्यात आला. त्याप्रसंगी सर्वप्रथम तात्यासाहेब महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मंचावरील मान्यवर एस.ओ. माळी (निवृत प्राचार्य प्रताप काॅलेज अमळनेर)व विलास पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले. मंचावरील प्रमुख अतिथी साहित्यिक गोकुळ बागुल, विजय पवार, प्रकाश पाटील,बी. एस. जाधव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. ओ. माळी यांनी विलास पाटील यांचा सत्कार केला. अध्यक्षांचा सत्कार ईश्वर महाजन जिल्हाध्यक्ष ओ बी सी असोसिएशन यांनी केला.मंचावरील सर्व मान्यवरांचे सत्कार झाले. यानंतर निवृत्त विलास पाटील( माजी मुख्याध्यापक)यांच्या विषयी मनोगतात साहित्यिक गोकुळ बागुल यांनी न थकणारा, सदैव तत्पर, उत्साही व चळवळीचे नेतृत्व करणारा धडाडीचे नेते म्हणून विलास पाटील यांच्याबद्दल उद्गार काढले. विजयसिंह पवार (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक)यांनी मनोगतात विलास पाटील यांनी देवळी येथे मुलामुलींसाठी शाळा सुरू करून गावाच्या प्रगतीत भर टाकली. मुली शिकू लागल्या. एक निस्पृह काम करणारा संस्थाचालक विलास पाटील असा गौरव केला. यानंतर विलास पाटील सरांनी आपण कसे घडलो, आपल्याला कशा अडचणी पार करुन प्रवास करावा लागला..आपल्याला वडिलांकडून कडक शिस्त, औदार्य, दातृत्व याचा अनमोल वारसा मिळाला असे भाषणात उल्लेख केला. आज फुटीरतावादी प्रवृत्तीमुळे पुरोगामी चळवळी खंबीर राहू शकल्या नाही हि खंत व्यक्त केली. आपण पुढील आयुष्य हे चळवळीसाठी अधिक प्रमाणात देइल अशी ग्वाही दिली. आपण लाचारी पत्करली नाही. त्यामुळे खडतर प्रवाहात टिकुन असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य माळी सरांनी कोणत्याही चांगल्या कामात झोकून देण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. जास्तीत जास्त पुस्तके वाचण्यात वेळ दयावा. माणसे जोडीत जावे असे सत्कार्य करावे असे त्यांनी नमूद केले. यावेळी नवनियुक्त मुख्याध्यापक व असोसिएशन चे पदाधिकारी एन. आर. चौधरी व सेवानिवृत्त शिक्षक एन.ए.साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशन चे पदाधिकाऱ्यांकडून विलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यात एन. ए. साळूंखे, प्रकाश पाटील, एन. आर. चौधरी, दीपक पवार, अश्विन पाटील, सोपान भवरे, सुरेश महाजन, आर. आर. सोनवणे, एम. आर. तडवी, मनोहर पाटील, सुधीर चौधरी, अजय भामरे आदिनी विलास पाटलांचा सत्कार केला. पत्रकार अजय भामरे,सोपान भवरे यांचा विलास पाटील यांनी लेखनमंच ह्या पुरोगामी साप्ताहिक सडेतोड पध्दतीने चालवितात म्हणून सत्कार केला. कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन डी. ए. सोनवणे सर यांनी केले तर आभार ईश्वर महाजन सर यांनी मानले.