अमळनेर प्रतिनिधी:- बापूराव ठाकरे.
अनुदानित आश्रम शाळा पिंपळे बु. ता.अमळनेर जि. जळगाव या ठिकाणी आज श्री योग शिरोमणी श्रद्धेय योगाचार्य यांच्या जन्मदिवस म्हणून आयुर्वेदिक जडीबुटी सप्ताह साजरा करण्यात येत असतो त्या अंतर्गत आश्रम शाळेत वृक्षारोपण करण्यात आले,यासाठी अग्रवाल समाज,पतंजली महिला योगसमिती चे सर्व योगशिक्षक,भारत स्वाभिमान यांनी अनमोल सहकार्य केले,तसेच विद्यार्थ्यांना मिष्ठान्न खाऊ वाटप करण्यात आले, यावेळी ज्योती चंद्रकांत पाटील, उर्मिला अग्रवाल,शर्मिला बडगुजर, सविता पाटील,पद्मजा पाटील,पूनम अग्रवाल,योगिता पांडे,कामिनी पवार,सुरेखा खैरनार,प्रीती नांडा,मनीषा शहा,सुनीता मोरे,बिमला अग्रवाल,यशस्वी अग्रवाल,गजानन माळी,सिद्धार्थ सोनवणे,भास्कर भावसार,हृदयनाथ मोरे,हिरकन पवार, बडगुजर सर,प्राथ. माध्य.मुख्याध्यापक अविनाश अहिरे,उदय पाटील ,विशेष सहकार्य सतिश कागणे, प्राथ.शिक्षक दीपक नांद्रे,संजू पवार,अधीक्षक प्रवीण पाटील, अधिक्षिका विद्या पाटील,चेतन पाटील,उदय पाटील,सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, सदर कार्यक्रमाचे संस्थेच्या अध्यक्षा सौ विद्याताई पाटील,सचिव युवराज पाटील यांनी कौतुक केले, व शुभेच्छा दिल्या.