अमळनेर ( वार्ताहर)- येथील अखिल सुवर्णकार महिला मंडळ अमळनेर तर्फे मंगळवारी “कोजागरी कार्यक्रम” यशस्वीरित्या आयोजित केला. त्या कार्यक्रमात खानदेश देवता भुलाबांईचे पूजन -आरती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर पारंपारिक गाणे, नाच व गरबा खेळला गेला. महिलांसाठी स्पर्धा देखील घेण्यात आली .या कार्यक्रमाला सौ. जयश्री ताई पाटील यांनी सदिच्छा भेट दिली व आनंद घेतला. कोजागरी निमित्त महिला मंडळाच्या मार्गदर्शक व सल्लागार सौ.निता अविनाश सोनार यांनी शब्द सुमनांनी आनंद व्यक्त केला. . तसेच अखिल सुवर्णकार महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. दीप्ती किशोर अहिरराव यांनी सर्वांचे कृतज्ञता पूर्वक आभार व्यक्त केले. कोजागरी कार्यक्रमात सर्वांनी ‘अल्पोपहाराचा’ आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्षा सौ. पुनम भामरे, कोषाध्यक्षा सौ. नूतन भामरे व सौ.शितल सोनार ,तसेच सौ.मधुमती भामरे ,सौ. समिता भामरे ,सौ गायत्री सराफ, श्रीम. पुष्पाताई वानखेडे , श्रीम. देवयानी जाधव यांनी कोजागरी कार्यक्रम यशस्वी व हर्ष उल्हासात पार पाडला.
पाच वर्षात तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी फक्त अनिल दादांनीच दिली साथ… तालुक्यातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मंत्री पाटील यांच्याच पाठीशी:- राष्ट्रवादी विद्यार्थी…
रयतसंदेश न्युज नेटवर्क:- अमळनेर(प्रतिनिधी )मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र राज्यांमधून एका लेखकाला त्यांचे साहित्य विश्वातील योगदान पाहून…