रयतसंदेश न्यूज नेटवर्क :-
अमळनेर (प्रतिनिधी) :-
29 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी पाच वाजता मराठा मंगल कार्यालयात दिवाळीनिमित्त फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने डॉ. अनिल शिंदे, (महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार), यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कार्यक्रमा व्यासपीठावर डॉ. अनिल शिंदे, प्रतिभाताई शिंदे, अविनाश भालेराव, प्राध्यापक सुभाष पाटील, धनगर दला पाटील, प्राध्यापक शाम पवार, संदिप घोरपडे सर, प्रताप आबा पाटील, परेश शिंदे, वेदांशू पाटील,मयूर पाटील, कुणाल पाटील,डॉ रवींद्र पाटील, डॉ. संदीप जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सुरवातीलाच काँग्रेसच्या महिलांच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी युती शासनाच्या काळात शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नसणे, कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचार, बेरोजगारी आणि जुनी पेन्शन योजना यासारख्या विविध समस्यांवर महायुतीवर जोरदार प्रहार केला. त्यांनी याशिवाय महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी अमळनेर तालुक्यातील सर्व जनता पाठीशी राहील असे सांगितले, पत्रकार बांधवांनीही डॉ. अनिल शिंदे यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले.
डॉ. अनिल शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. आज उमेदवारी अर्ज सादर करतांना महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव, तरुण, महिला, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मी सर्वांचे आभार मानतो.”
त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात नेते सहकार्य मागितले आणि आपल्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही याची खात्री दिली. “महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीनंतर अमळनेर तालुक्याचे सर्व प्रश्न मार्गी लावेल,” असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
या कार्यक्रमाला पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस आभार प्राध्यापक सुभाष पाटील यांनी मानले.
डॉ. अनिल शिंदे यांच्या उमेदवारीसाठी मिळालेल्या पाठिंब्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सकारात्मक परिणामाची अपेक्षा दर्शवली जात आहे असा पदाधिकाऱ्यांचा सुरू होता..