अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क इंग्लिश उजळणी व्याख्यानमालाप्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA), महाराष्ट्र राज्यचा उपक्रमइयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाची परीक्षाभिमुख तयारी अधिक सक्षम व्हावी या उद्देशाने प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन,
महाराष्ट्र राज्य (PTA) यांच्या वतीने “परीक्षेला जाता जाता…” याशीर्षकाखाली यशवंत PTA व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पूर्णतः निःशुल्क असून विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.शनिवार, दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेतहा कार्यक्रम ऑनलाईन (YouTube Live Lecture) माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे.या निःशुल्क व्याख्यानात इंग्रजी विषयाची संपूर्ण, नेमकी व परीक्षाभिमुख उजळणी अवघ्या दोन तासांत करून दिली जाणार आहे. परीक्षेच्या अंतिम टप्प्यात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत मार्गदर्शक व निर्णायक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.या व्याख्यानासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीनिवास इंग्लिश अकॅडमी, जळगाव येथील प्रसिद्ध इंग्रजी विषयतज्ज्ञ श्री. व्यंकटेश राजन अय्यंगार (अय्यंगार सर)हे मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून PTA महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष श्री. प्रशांत कासार सर,महासचिव श्री. मोहन गावडे सर,जळगाव PTA चे अध्यक्ष श्री. सुरेश राजपूत सर, उपाध्यक्ष श्री. हर्षल ठाकूर सर, तसेच PTA ची राज्य कोअर टीम व विविध क्लास संचालक उपस्थित राहणार आहेत.राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या निःशुल्क संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन PTA तर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी भैय्यासाहेब मगर सर (मो. 9423904483) यांच्याशी संपर्क साधावा.



