अनोखा उपक्रम,दिपावलीत टाकली पाचशे शुभेच्छा पत्रे!

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज

दिपावलीत टाकली पाचशे शुभेच्छा पत्रे!
पोस्टकार्ड हे समाजातील अत्यन्त महत्वाचे संदेश वहन माध्यम होते. त्याचा भावनिक संबंध होता.. लाल पेटी व खाकीतील पोस्टमन हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. सुख दुःख ख्यालीखुशालीचा निरोप 15 पैशाच्या पोस्टकार्ड ने येत जात असे, नंतर या पत्राची किंमत 25 पैसे तर आता गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळातही केवळ पन्नास पैसे इतकी आहे. म्हणजे केवळ 50 पैशात देशभरात कोठेही कुणालाही आपण आपला निरोप पोचवू शकतो. विशेष म्हणजे अपवाद वगळता पत्र पोस्ट केल्या पाडून तिसऱ्या दिवशी हमखास आपले पत्र पोचते इतकी विश्वसनीय यंत्रणा आहे,
तरीही अलीकडे लोकांना पत्र लिहिणे जमत नाही, नव्या पिढीला तर अशी काही यंत्रणा आहे हेच मुळी माहीत नाही.
50 पैसे दर असलेला छोटा कागद कुणी या गावाहून त्या गावाला नेऊन आपला निरोप पोचवतो याची माहीतीच अनेकांना नाही.
अशात काही लोक मात्र वर्षभर पत्र लिहीत लोकांना शुभेच्छा देणे, अभिनंदन करणे असे छंद जोपासत आहेत. यात अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार हे देखील एक आहेत. ते विविध कारणे वर्षभर विविध लोकांना पत्राद्वारे संपर्क करीत असतात. स्वतः रंगवलेली, आकर्षक व भावनांनी ओथंबलेली ही पत्रे हृदयाचा ठाव घेतात. श्री सोनार हे गेली 25 वर्ष ते दिवाळी निमित्त स्व हस्ते चित्र रंगवून दिवाळी शुभेच्छा देत असतात. आणि हे फक्त परिवारास नव्हे तर त्यांच्या संपर्कात असलेल्या सर्वाना ते आशा अनोख्या सदिच्छा देत आनंद पेरत असतात.
या दिपावलीत त्यांनी जवळपास 500 पत्र पाठविले असून अनेकांनी खूप वर्षांनी आमचे दारी पोस्टमन आला असे बोलून आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page