सामूहिक विवाह सोहळ्यांचे नियोजन मराठा सेवा संघाचा राष्ट्रीय वधुवर कक्षाचा पुढाकार- पी.एन.पाटील

धुळे प्रतिनिधी – रयत संदेश न्यूज

धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं भीषण संकट कोसळलं आहे. शेतकऱ्यांचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालंय. काहींची शेती पाण्याखाली गेली, काहींची जमीनच वाहून गेली. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या शेतकरी कुटुंबांपुढे आता मुला-मुलींच्या लग्नाचा प्रश्न अधिकच भीषण झाला आहे. अशा परिस्थितीत मराठा सेवा संघाचा राष्ट्रीय वधुवर कक्षाने एक दिलासादायक पाऊल पुढे टाकत सामूहीक विवाह सोहळयाचे नियोजन करीत आहे, अशी माहिती राष्ट्रीय वधुवर कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी बोलताना दिली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली, काही ठिकाणी जमीन दोस्त झाली , जमीन खरडून निघाली. शेतकऱ्यांचा अश्रूचा बांध सुटला. घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी पुढील वाटचाल कशी करावी.
मुला मुलींची लग्न कशी करावी, असे अनेक प्रश्न उभे राहिल्याने शेतकरी कुटुंब पूर्ण कोडमडले आहे. अशाप्रसंगी मदत करणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर, राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय पाटील, सोपान शिरसागर, सुनील महाजन, विलास पाटील, डॉ. आर. एस. पाटील संदीप पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने सामूहिक विवाह सोहळ्याचे मराठा सेवा संघ मार्फत आयोजन केले जाणार आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ज्या शेतकरी बांधवांच्या मुलींच्या लग्नासाठी योग जुळले असल्यास वर-वधू दोघांचे आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला, पूर्ण पत्ता व इतर परिपूर्ण माहिती द्यावी. जेणेकरून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत व सहकार्याने सामूहिक विवाह सोहळा चांगल्या पद्धतीने संपन्न करण्याची जबाबदारी राष्ट्रीय वधुवर कक्षामार्फत नियोजन केले जाणार आहे. सामूहिक विवाह नाव नोंदणीसाठी व परिपूर्ण माहिती देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याशी संपर्क साधावा (९४२१४३१०२०) असे आवाहनही त्यांनी केले आहे.
.. तरच विवाह संस्था टिकतील
मुला मुलींच्या पालकांच्या वाढलेल्या अवास्तव अपेक्षामुळे वाढते वय, दोघांना मिळालेले जॉब, कुटुंबातील कमी झालेला संवाद, शेतकरी शेतमजूर व्यवसायिक यांच्या बद्दल मुलींच्या पालकांची भूमिका नकारात्मक, ग्रामीण भागात लग्न न झाल्यामुळे 28 /30 च्या पुढील वयोगटातील मानसिक तणावात काही मुले व्यसनाधीन किंवा ताण-तणावामुळे वैद्यकीय औषधोपचार सुरू आहेत. हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात बदल केला तरच विवाह संस्था टिकतील, असे पाटील यांनी सांगितले.
वधु वर कक्षा मार्फत राबविले जाणारे उपक्रम
*वधु वर परिचय मेळावे
*परिपूर्ण माहितीसह आकर्षक अशी रेशीमगाठी परिचय पुस्तिका
*वधू वर व पालक समुपदेशन
*सामूहिक विवाह सोहळा आयोजन
*अवास्तव खर्च व अनावश्यक सोहळे टाळण्याबाबत जागृती व राज्यस्तरावर ठराव पास करण्यात आले.
समुपदेशन केंद्रातून मार्गदर्शन

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरमुळे पती-पत्नीत वि संवाद निर्माण होऊन घटस्फोटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कुटुंबातील सर्वच सदस्य समाज माध्यमांवर बराच वेळ गुंतून घेतल्यामुळे कुटुंबातील संवाद कमी होत आहे. मोबाईलच्या अतिरेक वापरामुळे एकमेकांमध्ये अविश्वास ताण तणाव गैरसमज निर्माण होत आहेत. या सर्व गोष्टींच्या परिणामामुळे नवदांपत्याला कौटुंबिक व न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. यामुळे ही सामाजिक गंभीर समस्या निर्माण होत आहे.
मराठा सेवा संघामार्फत समुपदेशन केंद्रातून यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
ज्या मुला मुलींचे योग जुळले आहेत ,ज्या पालकांनी सामूहिक विवाहसाठी नाव नोंदणी केली त्यांना कुठलाही खर्च राहणार नाही. इतर मान्यवरांच्या सहकार्यातून विवाह सोहळा संपन्न केला जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page