अमळनेरला १४ ऑगस्टला पत्रकारांना मार्गदर्शन सुपरिचय मेळावा
अमळनेर रयतसंदेश प्रतिनिधी
येथील व्हाईस ऑफ मीडिया , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व मंगळ ग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता श्री मंगळ ग्रह मंदिर येथे पत्रकारांना मार्गदर्शन तसेच नवीन आलेल्या पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांशी सुपरिचय मेळावा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे .
व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल ( जळगाव ) हे पत्रकारांना मार्गदर्शन करतील .येथील नूतन प्रांताधिकारी महादेव खेडकर , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा ,पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवालकर यांच्याशी सर्व पत्रकारांचा सुपरिचय या निमित्ताने होणार आहे .पोलीस निरीक्षक विजय शिंदे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.