अमळनेर शहरातील धुळे – चोपडा रोड वर स्वातंत्र्य दिनानिमित्त पालिकेतर्फे आकर्षक विद्युत रोषणाई.मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व अभियंता प्रशांत ठाकूर यांनी केले .
अमळनेर रयतसंदेश प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी माटी, मेरा देश” (मिट्टी को नमन, विरो को वंदन) हे अभियान संपुर्ण देशात राबविण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. अमळनेर शहरातील आपल्या देश, माती, मातृभुमीसाठी झटणारे, आपल्या प्राणाची आहुती देणा-या शुरविरांचा सन्मान व्हावा तसेच नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी याकरिता अमळनेर नगरपरिषद विद्युत विभागाने शहरातील धुळे – चोपडा रोड वर असलेले दुभाजकावर स्ट्रीट लाईट पोलवर तिरंगा विद्युत रोषनाई केली आहे यामुळे नागरिकांमध्ये या रोषणाईची आकर्षण होत आहे. रात्रीच्या वेळी शहरातील तिरंगा लाईटिंगमुळे शहरातील नागरिकांमध्ये देशाविषयी अभिमान निर्माण होत आहे या उपक्रमामुळे नगरपरिषदेने केलेल्या कामाचा जनसामान्यातून चांगले काम केल्याच्या प्रतिक्रिया मिळत आहे. आपण अमळनेरात नसुन दुस-या शहरात असल्याचे भासत आहे. नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व अभियंता प्रशांत ठाकूर यांचे अभिनव व चांगली कल्पना असल्याचे बोलले जात आहे.