अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावातील तीन वर्षीय चिमुरडी यज्ञा दुसाने हिच्यावर झालेल्या अत्याचार आणि निघृण हत्या च्या निषेधार्थ अमळनेर येथील ‘ अखिल सुवर्णकार महिला मंडळा’ तर्फे उपविभागीय अधिकारी सो, यांना निवेदन देण्यात आले . गुन्हेगाराला कठोर शासन व्हावे, फाशी व्हावी, महिलांना व मुलींना संरक्षण देण्यात यावे ,अशा प्रकारचे निवेदन महिलांमार्फत देण्यात आले. समाजातील मोठ्या संख्येने मुली , महिला हजर होत्या. सौ. नूतन भामरे, सौ. हेमलता भामरे , सौ.रमा भामरे , सौ.दीप्ती अहिरराव, सौ. समिता भामरे, सौ. शीतल सोनार, सौ पूनम भामरे, सौ दिपाली सराफ, सौ हर्षाली सराफ, व सुवर्णकार महिला मंडळाच्या सर्व सदस्या हजर होत्या.



