मुंदडा इस्टेटचा स्वातंत्र्यदिनी क्रिडा व विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न*

*मुंदडा इस्टेटचा स्वातंत्र्यदिनी क्रिडा व विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न*

अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

शहरातील मुंदडा इस्टेटच्या हौसिंग सोसायटीने स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर क्रीडा व विविध स्पर्धांचे आयोजन केले होते,यात राष्ट्रगान,चित्रकला, सामान्य ज्ञान,क्रिकेट,१०० मी धावणे यासारख्या स्पर्धा घेतल्या गेल्या.
येथील रहिवाशी महिलांनी प्रथमच क्रिकेट मध्ये सहभाग नोंदवत खेळाचे उत्तम प्रदर्शन केले.या महिला संघाचे कर्णधार वैशाली साळुंखे या होत्या.
यासोबतच सर्व वयोगटाच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवत यश संपादन केले. यावेळी इतर स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना १८ सुवर्ण,१८ रजक आणि १८ कांस्य पदक बक्षिसांच्या रुपात वितरीत करण्यात आले.हा पुरस्कार वितरण सोहळा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पार पडला. यावेळी कार्यक्रमाला मुंदडा बिल्डर्सचे संस्थापक ओमप्रकाश मुंदडा, अमेय मुंदडा, हौसिंग सोसायटचे अध्यक्ष नीरज चव्हाण,सचिव गणेश शिंगारे तसेच रहिवाशी उपस्थित होते.सुत्रसंचालन संदेश पाटील यांनी केले.

You cannot copy content of this page