अमळनेर (प्रतिनिधी):- रयत संदेश न्यूज नेटवर्क
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्हि. एम.पाटील अध्यक्षस्थानी होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.उपशिक्षक ए.ए.पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्याचा इतिहास आपल्या मनोगतातून उलगडला.यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक ए.डी.भदाणे,पर्यवेक्षक एस.आर. शिंगाने,सी.एस.सोनजे,खानदेश शिक्षण मंडळाचे शिक्षक प्रतिनिधी राहुल पाटील,जेष्ठ लिपीक जयश्री भालेराव,आर.जे.पाटील व्यासपीठावर उपस्थित होतें.
सूत्रसंचालन विद्यार्थी संघाचे प्रमुख डी.एम.निघोट तर आभार हर्षल चौधरी यांनी मानले.यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



