अमळनेर रयत संदेश न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्हा NSUI च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अॅड. कौस्तुभ पाटील यांचा पदग्रहण सोहळा मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न असुन सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी व युवक उपस्थित होते
काँग्रेस पक्षाचा जिल्ह्यात अनेक वर्षानंतर NSUI चा मेळावा झाला असुन यास जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला
या कार्यक्रमास काँग्रेसचे प्रवक्ते श्री. हनुमंत पवार, प्रदेश सरचिटणीस श्री. भाऊसाहेब आजबे, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष (पश्चिम) श्री. अविनाश भालेराव, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष (पूर्व) श्री. धनंजय शिरीष चौधरी तसेच इतर अनेक जेष्ठ नेते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. हनुमंत पवार यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत नीट (NEET) पेपर घोटाळा व TET पेपर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारला धारेवर धरले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या घटनांचा त्यांनी निषेध व्यक्त केला.
श्री. भाऊसाहेब आजबे यांनी NSUI चा इतिहास, कार्यपद्धती आणि विद्यार्थी राजकारणाचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी संघटनात्मक बळ वाढवून सामाजिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले.
यावेळी अॅड. कौस्तुभ पाटील यांनी आपल्या मनोगतात NSUI च्या आगामी वाटचालीबाबत सविस्तर भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देण्याची व संघटना अधिक बळकट करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक व जेष्ठ नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील महाविद्यालयात NSUI शाखा उभारणी व संघटन बांधणी वर लक्ष केंद्रित करणार आहे




