अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
शनिवार, दि.14 फेब्रु. अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारवड कन्या व मारवड बॉईज येथे विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आयोजित ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात पार पडला. कृतीयुक्त व आनंददायी शिक्षण या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल उभारले. यात मुलींचे 19 व मुलांचे 12 असे एकूण 31 खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यामध्ये वडापाव, खमण, इडली, दाबेली, भेळ, चना उसळ, बाफलेल्या शेंगा, भाजलेल्या शेंगा, गुलाबजामुन, नानखटाई, बोराणी, मसाला ताक, कप केक, खाकरा, चोराफल्ली, पोंगे बटाटे, पॉप कॉर्न इ.चविष्ट खाद्य पदार्थांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. शाळेमार्फत मजेशीर खेळांसाठी स्वतंत्र गेम झोन तयार करण्यात आले होते. यात इ.1 ली साठी बादलीत चेंडू टाकणे (बकेट बॉल), इ.2 री साठी बॉटलमध्ये रिंग अडकवणे (बॉटल रिंग), इ.3 री साठी संगीत खुर्ची प्रमाणे संगीत बंद झाल्याबरोबर बॉटल उचलणे (बॉटल चुनो), इ.4 थी साठी पायाला फुगा बांधून स्वत:चा फुगा वाचवून इतरांचा फुगा फोडणे (बलून गेम) असे मजेशीर खेळ घेण्यात आले. या स्पर्धेत इयत्तानिहाय विजयी विद्यार्थी पुढीलप्रमाणे…
मुलींच्या गटात विजयी विद्यार्थीनी
बकेट बॉल – तमन्ना अनिल पाटील
बॉटल रिंग – गुंजन उमेश चौधरी
बॉटल चुनो – फाल्गुनी नामदेव पाटील
बलून गेम – कृतिका भटू पाटील
मुलांच्या गटात विजयी विद्यार्थी
बकेट बॉल – गितेश रविंद्र शिंदे
बॉटल रिंग – भावेश महेश साळुंखे
बॉटल चुनो – गिरीश समाधान शिंदे
बलून गेम – प्रथमेश पवन साळुंखे
मातृपितृ पूजन दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थीनींनी आपल्या आई-वडीलांचे औक्षण करुन पूजन केले.

मेळाव्यात खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना गणितीय व्यवहार, पैशांचे नियोजन, नफा-तोट्याची समज आणि
दैनंदिन व्यवसायाचे महत्त्व यांची प्रत्यक्ष अनुभवातून ओळख झाली. पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांकडून वस्तू खरेदी केल्या व त्यांना प्रोत्साहन दिले.
अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, मारवड बीटचे शिक्षणविस्तार अधिकारी रावसाहेब पाटील, मारवड गावाचे सरपंच आशाताई पवार व उपसरपंच भिकनराव पाटील यांचे मार्गदर्शन व प्रेरणेने तसेच मारवड विकास मंचच्या सहकार्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्धाटन ग्रा.पं.सदस्य सचिन साळुंखे यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मारवड केंद्रांचे केंद्रप्रमुख अशोक सोनवणे, शा.व्य.समिती अध्यक्ष श्रीकांत पाटील, चंद्रशेखर साळुंखे, उपाध्यक्ष शेखर पाटील, सदस्य एल.जी.चौधरी, सदगुरु कोळी, चेतन चव्हाण, सुनिता पाटील, कविता साळुंखे, छाया पाटील, शारदा बडगुजर, राणी पाटील, ग्रामस्थ तथा पालक देविदास साळुंखे, बशीर शेख, सुभाष शिंदे, पुनमचंद शिंदे, शैलेश बडगुजर, दिनेश बडगुजर, किशोर पाटील, अशोक कोळी यांसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी व आभार बॉईज शाळेचे मुख्याध्यापक महेश बोरसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक गिरीश पाटील, सुधीर पाटील, सविता पाटील, विशेष शिक्षक हंसराज पाटील, माजी विद्यार्थीनी तथा सहयोगी शिक्षिका प्राजक्ता साळुंखे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका व दोन्ही शाळेचे विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न केले.
दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांच्या प्रयत्नातून सदर उपक्रम यशस्वी झाला. उपस्थितांनी आयोजनाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.




