श्रीमती द्रौ .रा.कन्या शाळेत रयतेचे राजे ,दूरदर्शी , सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करुन विविध कार्यक्रम घेण्यांत आली.

अमळनेर रयत संदेश न्यूज नेटवर्क –

खा.शि.मं. संचलित श्रीमती द्रौपदीबाई रांमचंद्र शेठ कन्या शाळेत “२६ जुन हा दिवस ” रयतेचे सर्वांचे आवडते राजे ,राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या सत्यशोधक , लोकाभिमुख आणि परिवर्तनवादी विचार , समाजातील गोरगरीब , वंचित पीडीत आणि अपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या शाहू महारांचे कार्य आज ही प्रेरणादायी मानले जाते .

या कार्यक्रम साठी अध्यक्ष स्थानी नुकत्याच शहर अध्यक्ष पदी निवड झालेले व दै.जनवास्तवचे संपादक व पत्रकार श्री.चेतनभाऊ राजपुत , प्रमुख पाहुणे दै.महा दर्पन मराठी वृत्त पत्रांचे संपादक श्री रविंद्र भाऊ मोरे , विदयालयाच्या मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडम , माधुरी राणे प्राथ.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती आठवले मॕडम , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ सर , शिक्षक प्रतिनिधी सौ पी पी जोशी , प्रमुख वक्ता कु.स्नेहल शिसोदे मॕडम ,जेष्ठ कला शिक्षक श्री एस एस माळी ,जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री के आर बाविस्कर , श्रीमती आर एस सोनवणे , जेष्ठ लिपीक श्री शाम भाऊ पवार यांच्या शुभ हस्ते रयतेचे राजे व आरक्षणाचे जनक गोर गरीबांचे भाग्यविधाता छ.शाहू महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी नुकत्याच अमळनेर शहर राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदी निवड झालेल्या श्री चेतनभाऊ राजपुत व नुकताच पुरस्कार प्राप्त पत्रकार श्री रविंद्र भाऊ मोरे यांचा विशेष सत्कांर सन्मान शाल , श्रीफळ , महारांजाचे पुस्तक , बुके देऊन मुख्याध्यापिका यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती एस एस सुर्यवंशी मॕडम यांनी रयतेराजे शाहु महारांज यांच्या विषयी कार्याचा गुण गौरव व गरीब जनतेसाठी केलेले कार्य , आरक्षणाचे जनक , सर्वांना हक्क देणारे पहिले राजे असुन , त्यांचे कार्य महान आहे असे आपल्या शब्दात सांगितले .तसेच यावेळी महारांजा विषयी निंबध स्पर्धाचे आयोजन सुध्दा करण्यात आले.सकाळ , दुपार मध्ये पहिल्या तीन विद्यार्थीनींना महाराजांचे पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. युवा कल्याण प्रतिष्ठान यांच्या कडुन वक्त्या म्हणुन आलेल्या कु. स्नेहल शिसोदे मॕडम यांनी शाहु महारांजाचा जीवन पट मांडला.

शेवटी अध्यक्षीय भाषनात श्री चेतन भाऊ राजपुत यांनी छ.शाहू महाराजांनी कोल्हापुर संस्था मार्फत राजेनी सामाजिक क्षैत्रात केलेले कार्य , शरीर निरोगी व सुदृड होण्यासाठी व्यायामचे आखाडे व गरीबांना रोजगार दिला व त्यांना शिक्षण प्रवाहात आणल्यांचे महान कार्याबद्दल सांगितले .

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती एस एस देवरे मॕडम व आभार सौ.पी एस सराफ मॕडम यानी मानले.सदर कार्यक्रमासाठी महत्वांचे अनमोल सहकार्य शालेय सामिती चेअरमन श्री जितेंद्र जैन ,व सर्व शिक्षिका , शिक्षकेतर बंधु यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page