मा.आमदार अनिलदादा पाटील फुंकणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीचे रणशिंग.
अमळनेर रयत संदेश न्यूज :-
अमळनेर मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका व शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कलागुरु मंगल कार्यालय, धुळे रोड अमळनेर येथे करण्यात आले आहे.
माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होणार असून सदर मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.आगामी काळात होणारी नगरपरिषद निवडणूक आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहर व ग्रामिण भागाचा संयुक्त मेळावा होत आहे.मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक नुकतीच आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली होती,ग्रामिणच्या बैठकीत कार्यकर्त्यांकडून महायुती बाबत सकारात्मकता दर्शविण्यात येऊन आमदार पाटील जो निर्णय घेतील


