पत्रकार, विक्की जाधव यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज

अमळनेर पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे पत्रकार विक्की जाधव यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई विभागाच्या अमळनेर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार संवाद यात्रेचे शिल्पकार वसंतराव मुंडे, कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या सूचनेनुसार आणि तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. पत्रकारांच्या हितासाठी काम करण्याची नवी जबाबदारी जाधव यांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याने पत्रकार वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

 

*स्थानिक प्रश्नांवर निर्भीड भूमिका, डिजिटल आणि प्रिंट च्या माध्यमातून प्रभावी मांडणी आणि जनहिताच्या विषयांचा सातत्याने पाठपुरावा ही पत्रकार विक्की जाधव यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये मानली जातात.* तालुक्यातील पत्रकारांच्या विविध अडचणी, हक्क आणि प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच पत्रकारांमध्ये समन्वय वाढविणे, संघटनेचा विस्तार करणे आणि पत्रकारिता अधिक सक्षम करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

या नियुक्तीचे पत्रकारिता, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. यावेळी नव्या जबाबदारीबाबत पत्रकार विक्की जाधव यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीमुळे अमळनेर तालुक्यातील पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ मिळण्यासह पत्रकारांच्या प्रश्नांना अधिक संघटित आणि प्रभावी आवाज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page