अमळनेर तालुका प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क
मारवड ता.अमळनेर येथील कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे प्रा.विजय भाईदास पाटील ( ग्रंथपाल ) यांची अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ (ABRSM) संलग्नित एन- मुक्ता या प्राध्यापक संघटनेच्या स्थानिक शाखेच्या अध्यक्ष पदी सर्वानुमते आणि एकमताने बिनविरोध संघटनेच्या अध्यक्ष पदा साठी निवड करण्यात आली.
तसेच प्रा.डॉ.एस. एस. पाटील यांची सचिव पदी, तर प्रा. डॉ.एस.एच.पारधी यांची खजिनदार पदा साठी निवड करण्यात आली. प्रा.डॉ.पी.सी.पाटील एन- मुक्ता केंद्रीय सचिव यांच्या उपस्थितीत विचार विनिमय करून २०२६ – २७ या वर्षासाठी कार्यकारणी स्थापन करण्यात आली.
या निवड बद्दल प्राचार्य डॉ.व्ही.एस. देसले आणि प्राध्यापक तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी स्वागत करून सत्कार केला. आणि अभिनंदन केले.




