गीत बहार म्युझिकल ग्रुप अमळनेर तर्फे “सुरीला सफर ” कार्यक्रमाचे आयोजन 

अमळनेर तालुका प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज

अमळनेर येथील प्रसिद्ध गायक कलाकारांनी मिळून गीत बहार म्युझिकल ग्रुप हा ग्रुप केला आहे. या ग्रुप तर्फे जुन्या नव्या अजरामर गीतांच्या “सुरीला सफर ” या कार्यक्रमाचे खास अमळनेरकर रसिकांसाठी आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी मराठा मंगल कार्यालय इथं होणार आहे. कार्यक्रम संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होईल. या कार्यक्रमात पूर्वा वशिष्ठ, शुभांगी खंडाळे, उज्वल पाटील, अनिल बनसोडे, शाम संदानशिव सुनिल भोई, हे गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन पूजा शहा करणार आहेत.

हा या ग्रुप चा पहिलाच कार्यकम आहे. अमळनेरकर रसिकांसाठी या पुढेही दर्जेदार आणि श्रवणीय कार्यक्रम देण्याचा ग्रुप चा मानस आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page