जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा,सेंट मेरी स्कुल ची उल्लेखनीय कामगिरी

*विभागीय स्तरावर सेंट मेरी स्कूल च्या हॉकी संघाची निवड*

अमळनेररयतसंदेश न्युज:

  1. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद जळगाव द्वारा आयोजित जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा दिनांक ०६/०९/२०२३ मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या . सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूल ,मंगरूळ तालुका अमळनेर येथील १४ वर्षा आतील मुली या गटातील संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला व त्यांची विभागीय स्तरावर निवड करण्यात आलेली आहे तरी या सर्व खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जाईस, उपमुख्याध्यापिका सिस्टर् सिन्सी, मॅनेजर मदर अर्चना, यांनी गुलाब पुष्प देऊन सत्कार केला, या सर्व खेळाडूंचे शाळेचे क्रीडा शिक्षक श्री कमलेश मोरे सर, श्री किरण शिंपी सर, हॉकी संघाचे कोच सौ कविता पाटील मॅडम, भावना गुजर मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
    खालील संघाची विभागीय स्तरावर निवड करण्यात आलेली आहे.

*निवड झालेल्या खेळाडूंची नावे*
१) वैष्णवी पाटील २) नेहा वाल्हे ३) अमृता पाटील ४) अनन्या पाटील ५) प्रांजल पाटील ६) दिशा महाजन ७) तेजश्री साळुंखे ८) गुणगुण चव्हाण ९) श्रावणी पाटील १०) प्राची खैरनार ११) ज्ञानदा पाटील १२) कस्तुरी रोडगे १३) याशवी पाटील १४) नव्या पवार १५) रिद्धी बडगुजर १६) तनिष्का जाधव १७) तन्वी चौधरी १८) हिरण्या गुरव

You cannot copy content of this page