*धनदाई महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा संपन्न.*
अमळनेर रयतसंदेश न्युज :
धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विभागीय आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री व बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली. याप्रसंगी धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, संचालक शैलेंद्र पाटील, राधेश्याम पाटील, विभागीय क्रीडा सचिव डॉ. विजय पाटील , क्रीडा संचालक डॉ. शैलेश पाटील यासह विविध महाविद्यालयातील क्रीडा संचालक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थीत होते.
सकाळी ०७ वाजता मुले व मुली यांची दहा किलोमीटर धावण्याची क्रॉस कंट्री स्पर्धा सुरू झाली. धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी डी पाटील यांनी मुलांना, तर कोषाध्यक्ष शैलेंद्र पाटील यांनी मुलींना हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेत सुरुवात केली. मुलांच्या गटात अनुक्रमे विशाल पारधी (चोपडा), सोमनाथ महाजन(भडगाव), शुभम निकुंभ(भडगाव) , सागर धनगर (चोपडा), विशाल पाटील (भडगाव), लुभांसिंग वंजारी (भडगाव) हे सहा विद्यार्थी तर मुलींच्या गटात अनुक्रमे विद्या महाले(भडगाव), ज्योती पाटील (भडगाव), सोनालिका पाटील (भडगाव),मिनी बारेला (चोपडा), संगीता पावरा (चोपडा), सुनीता वडर (चोपडा) या सहा विद्यार्थ्यांनी विजेत्या ठरल्या व विद्यापीठ फेरीसाठी निवडण्यात आल्या. स्पर्धेचे पंच म्हणून डॉ. हर्षल सरदार, डॉ. देवदत्त पाटील, डॉ. क्रांती क्षीरसागर, सुनील जाधव, डॉ. संजय भावसार, डॉ. दिनेश तांदळे, यांनी कामकाज पाहिले.
सकाळी दहा वाजता बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे चेअरमन के. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एस.एस. बी. टी . अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संघ प्रथम, प्रताप महाविद्यालय अमळनेर चा संघ द्वितीय तर महात्मा गांधी महाविद्यालय चोपडा हा संघ तृतीय हे विजेते ठरले. या स्पर्धेचे पंच म्हणून प्रविण ठाकरे, डॉ. शैलेश पाटील, डॉ. क्रांती क्षीरसागर, डॉ. किशोर वाघ यांनी काम पाहिले. तर स्पर्धेच्या यशस्वितेसाठी धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.