आरोग्य सेविका सौ. सुवर्णा आनंदा धनगर यांचा मराठी सिनेअभिनेत्री किशोरी शहाणेंच्या हस्ते गौरव

अमळनेर रयतसंदेश न्युज –

जळगाव येथे ‘आस बहुउद्देशीय विकास संस्था’, ‘प्रीतम पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड’, आणि ‘सप्तरंग मराठी चैनल आयोजित’, खान्देशातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या 24 व्यक्तींचा मराठी सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते “खान्देशीयन ऑफ द इयर 2024” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात अमळनेर तालुक्यातील सौ. सुवर्णा धनगर (आरोग्य सेविका) वाळकी (प्राथमिक आरोग्य केंद्र हातेड अंतर्गत) ता.चोपडा येथे कार्यरत असून त्यांना “खान्देशीयन ऑफ द इयर 2024” मराठी सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सौ. सुवर्णा धनगर यांच्या मते आपले “आयुष्य हे क्षणभंगुर आहे” आणि म्हणून आपण आणि आपल्या सारख्या सर्व लोकांनी समाजासाठी आपले आयुष्य जगले पाहिजे, सुवर्णा धनगर ह्या या भावनेने नेहमी आपले कार्य करीत असतात. त्यांनी केलेले आदिवासी क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय असे आहे.जसे की , आदिवासी क्षेत्रातील महिलांचे समुपदेशन, शाळेतील मुला – मुलींचे आरोग्यविषयी व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन, मुलींना मासिक पाळी संदर्भात समुपदेशन, ग्रामसभा घेऊन गावातील सर्व लोकांना आरोग्य विषयी जनजागृती, मुलींचे हिमोग्लोबिन चेक करून पुढील आहाराविषयी मार्गदर्शन करणे, नेहमी आपल्या कार्यात प्रामाणिकपणे काम करून इतरांना ते आरोग्य देत असतात. त्यांनी जुळ्या मुलांची प्रसुती सुद्धा यशस्वीरित्या केलेली आहे. याच वर्षी “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत चोपडा व अमळनेर तालुक्यातील अनेक शाळांना भेटी देउन मुलांना स्वच्छते विषयी व मुलींना मासिक पाळी संदर्भात समुपदेशन केलेले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुण मुला-मुलींना,ज्येष्ठांना ते योगा, व्यायामाच्या माध्यमातून आपले जीवनमान निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी कोरोना काळात सर्व समाज आपले कुटुंब समजून केलेल्या कार्याबद्दल सुद्धा त्यांचे विविध क्षेत्रातील समाजाकडून त्यांचे कौतुक करण्यात आले होते. समाज सुद्धा ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांना कौतुकाची थाप देत असतो. ही सर्व कामे पाहता त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना त्यांच्या या महान कार्यात खंबीर साथ असते त्यांच्या पतींची, त्यांचे पती आनंदा बापू धनगर हे करणखेडे ता. अमळनेर येथे एक आदर्श माध्यमिक शिक्षक आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page