कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवितांना सरकार व प्रशासन जबाबदार…. संदीप घोरपडे

 रयतसंदेश न्युज नेटवर्क:-

अमळनेर ( प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवितांना अतिशय घाई घाईने जाणीवपूर्वक अयोग्य पद्धतीने परिस्थिती हाताळल्याने जो उद्रेक झालाय त्याला पूर्णतः सरकार व प्रशासन जबाबदार आहे.या कारणास्तव अमळनेर शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणात न्यायाची मागणी करण्यासाठी अमळनेर प्रांत कचेरीवर धडकले.आणि निवेदन देण्यात आले.त्यांच्या समवेत विविध क्षेत्रातील अनेक समाजातील धुरीनांनी हजेरी लावली

यात प्रामुख्याने काँग्रेस तालुका अध्यक्ष बी.के.सूर्यवंशी. जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे. गोकुळ बोरसे. के.डी. पाटील.डॉ. अनिल शिंदे. सौ.तिलोत्तम पाटील. इम्रान खाटीक.अजहर सय्यद. युवक अध्यक्ष एड. शकील काजी.यासह अनेक नामवंत व्यक्ती सदर मोर्चात येऊन प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी आपले मत व्यक्त करताना काँग्रेस सरचिटणीस संदीप घोरपडे यांनी एकूणच महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती दिली या माहितीत हेरिटेज यादीमध्ये अर्थात पुरातत्व विभागाच्या यादीत गडकिल्ल्यांवरील विविध प्रकारच्या स्थावर जंगम मालमत्तांची माहिती दिली यामध्ये विविध किल्ल्यांवर लोकवस्तीचे पुरावे प्रांताधिकारी आणि प्रशासनासमोर मांडले यात मुंबई येथून जवळच असलेली घारापुरी येथे लोक वस्तीचा पुरावा दिला प्रतापगडावरील लोकवस्ती व दुकानांची माहिती दिली त्याचप्रमाणे जंजिरा किल्ला तसेच इतर अनेक ऐतिहासिक गड किल्ल्यांची माहिती सांगताना यात मुस्लिम समाजाचे योगदान अधिक मोठे असल्याचे सांगितले व शिवाजी महाराजां समवेत राज्य स्थापनेत विविध जाती धर्माच्या 18 पगड मावळ्यांचा समावेश असल्याने तिथे शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला मानाचे स्थान दिलेले आहे एवढेच नाही तर प्रतापगड किल्ल्यावरील आपला शत्रू अफजलखानाची कबर देखील बांधून विविध धर्मात सलोखा राखण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले आणि आज मात्र देशाचे गृहमंत्री देशातील मणिपूर अथवा काश्मीरमधील अत्याचाराकडे साफ काना डोळा करतात त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्राचे गृहमंत्री अतिशय सुसंस्कृत बनवल्या गेलेल्या पुणे शहरात मैदानात उतरा ठोकून काढा अशा प्रकारची *भडकाऊ भाषणे करून समाजमन विचलित करण्याचे काम करीत आहेत* यावर हल्लाबोल चढविला व आम्ही समाजात शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य करणारे कार्यकर्ते पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अधिक तंदुरुस्त राखण्याची जबाबदारी आमची आहे आणि म्हणून आम्ही इथे येऊन आपणांसमोर हे निवेदन देत आहोत की महाराष्ट्र शासनाला प्रशासनाला आमचे म्हणणे कळवा व महाराष्ट्राची स्थिती अधिक बिघडू नये याकरता सर्वांनी हातभार लावावा असे आपल्या वक्तव्यातून सांगितले त्यानंतर प्रा.अशोक पवारसर.आरिफ भाई. के. डी. पाटील. रियाज मौलाना यांची भाषणे होऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनावर हाजी नशीरोद्दीन शेख. अध्यक्ष अमळनेर मुस्लिम शहर कमेटी – सय्यद अजहर अली. सईदहाजी. नाविद शेख.अल्तमश शेख.आकिब अली.अख्खतर अली.जुबेर पठाण .इमरान भाया. माजी नगरसेवक फिरोज पठाण. माजी नगरसेवक सलीम टोपी .आरीफभाया.हाजी दबीर पठाण. साबीर पठाण. मुख्तार खाटीक. इम्रान खाटीक. एड.शकील काझी. गुलाम नबी पठाण .आबीद अली. मुस्ताक शेख. इमरान कादर शेख. ताहेर शेख .रियाज मौलाना. आरीफ पठाण. बशीरशेख. ईबा सय्यद. अल्ताफ राजा. अरशद पठाण .वलीद शेख. शाहीद शेख. नाईम पठाण. मोसीन शेख. सलमान शेख.यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उपस्थित समाज बांधव आणि  मोर्चेकरी शांततेत आपापल्या घरी परतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page